विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अच्छे दिन कोठे आहेत म्हणत मोदी सरकारसह भाजपावर सडकून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला टोमणेसभा म्हणत निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…’ असा टोला लगावला. त्यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्या या सभेवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?”

“असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना यापैकी काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेला टोमणेसभाम्हणत टोला लगावला.

हेही वाचा : Uddhav Thackeray Aurangabad Sabha Updates : हिंदूत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे म्हणाले होते, “अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी दिली जाते आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर येतात, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आल्या की पुन्हा कोणती तरी मशीद पाडली जाते म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत.”