मुंबई : भविष्यातील नेतृत्व स्पर्धा, जातीची गणिते किंवा मित्रपक्षांचा दबाव याला अधिक महत्त्व न देता भाजप श्रेष्ठींनी अपेक्षेप्रमाणे पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची आणि मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घातली. मुख्यमंत्रीपदासाठी अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेला एकनाथ शिंदे यांचा आग्रह भाजपने निष्ठुरपणे मोडून काढलाच; पण महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवारांना भेट नाकारून यापुढे सत्तास्थापनेत दोन्ही मित्रपक्षांच्या म्हणण्याला गौण स्थान असेल, असा संदेशही दिला.

महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते. २०२२पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. गेला आठवडाभर शिंदे यांनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजप श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.

New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Mumbai Police Deploy in azad maidan for swearing-in
Maharashtra Government Formation : ५०० हून अधिक पोलीस तर साडेतीन हजार कॉन्स्टेबल, शपथविधीसाठी पोलिसांचा ‘असा’ असेल बंदोबस्त!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत बुधवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची औपचारिक निवड जाहीर करण्यात आली. विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाल्यावर फडणवीस यांनी निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल जनतेचे आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व नेत्यांचे आभार मानले. त्याचवेळी ‘सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ‘पुढील काळात चार गोष्टी मनासारख्या होतील, तर चार मनाविरुद्ध होतील. पण आपण व्यापक जनहिताच्या दृष्टीने काम करून आपली शक्ती दाखवून देऊ व सर्वांशी जुळवून घेऊ, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis New CM: शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी आता मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांच्या शिक्षिकेने सांगितल्या शाळेतील गंमती जमती!

पुढील वाट अपेक्षापूर्तीची व संघर्षाची आहे. आपण एक उद्दिष्ट ठेवून राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कोणीतरी मोठे करावे, यासाठी आलो नाही. एवढा मोठा कौल मिळाल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. पण आपण व्यापक जनहिताच्या दृष्टीने काम करून आपली शक्ती दाखवून देऊ. देवेंद्र फडणवीस, भाजप विधिमंडळ पक्षनेते

२०१४ ते २०२४…

भाजपला २०१४पासून राज्यात मोठे यश मिळवून देण्यात फडणवीस यांचे नेतृत्व आणि प्रतिमा मोलाची ठरली आहे. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस यांच्या एककल्ली कारभारामुळे पक्षांतर्गत शत्रू तयार झाले. त्याचा त्यांना राजकीय फटकाही बसला होता. पण नंतर त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यावर भर दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठा फटका बसला होता. तेव्हा फडणवीस यांना जातीवरून लक्ष्य करण्यात आले होते. पण लोकसभेतील पराभवानंतर फडणवीस यांनी चित्र बदलण्यावर भर दिला. मराठा समाजाला आपलेसे करतानाच ओबीसी समाजाचे ध्रुवीकरण भाजपच्या बाजूने कशा प्रकारे होईल याकडे लक्ष दिले. ही रणनीतीही लाभदायक ठरली.

पुढील वाट अपेक्षापूर्तीची व संघर्षाची आहे. आपण एक उद्दिष्ट ठेवून राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कोणीतरी मोठे करावे, यासाठी आलो नाही. एवढा मोठा कौल मिळाल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. पण आपण व्यापक जनहिताच्या दृष्टीने काम करून आपली शक्ती दाखवून देऊ. – देवेंद्र फडणवीस, भाजप विधिमंडळ पक्षनेते

Story img Loader