मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या वाढदिवशी दिवसभर राज्यभरातील पावसाचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची माहिती घेत होते आणि सातत्याने बुलढाणा, यवतमाळ, अकोला प्रशासनाशी संपर्कात होते. दिवसभर अनेक मान्यवरांनी त्यांना दूरध्वनी, ट्विटर आदी माध्यमांतून शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 अहेरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आज देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीला जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते जाऊ शकले नाहीत. या कार्यक्रमाला त्यांनी दृक्-श्राव्य माध्यमातून हजेरी लावली. ते सकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत होते आणि सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते.

 अनेक मान्यवरांनी दूरध्वनी करून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आदी मान्यवरांचा समावेश होता.