महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी केवळ सदिच्छा भेट घेतली. यातून कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नका, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. 
फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कृष्णकुंजमधून बाहेर आल्यावर फडणवीस पत्रकारांना म्हणाले, आजच्या राज ठाकरे यांच्या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नाही. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार, असे सांगितले होते. त्यानुसार आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यातून कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नका.

Story img Loader