Devendra Fadnavis on Amit Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप व तिकीट वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अनेक मतदारसंघांमधील नाराजांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला, अर्थात ४ नोव्हेंबरला काय घडेल, याविषयी तर्क-वितर्क चालू असतानाच माहीम मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली भूमिका चर्चेत आली आहे.

काय आहे माहीम मतदारसंघात परिस्थिती?

माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पण चर्चा आहे ती सदा सरवणकर यांची. विद्यमान आमदार सदा सरवणकर या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारीसाठी पू्र्ण तयारीत होते. पण अमित ठाकरेंच्या उमेदवारीमुळे माहीम मतदारसंघातली गणितं बदलली.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
Shiv Sainiks held a meeting and decided not to work as a candidate of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच काम करणार नाहीत, शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा डाव….;शिवसैनिक आक्रमक
Badnera Vidhan Sabha Assembly Priti Band
Priti Band : उद्धव ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत बडनेरात ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष निवडणूक लढणार
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान
Chandrasekhar Bawankule critisize Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

एकीकडे राज ठाकरेंनी महायुतीकडे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला जाऊ नये, अशी मागणी केली असताना दुसरीकडे सदा सरवणकर मात्र उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसाच तो अमित ठाकरेंनाही त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व चर्चांवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माहीमबाबत भाजपाची काय आहे भूमिका?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माहीम मतदारसंघ व अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांचीही याला मान्यता होती की तिथे उमेदवार देऊ नये. पण त्यांना काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाचं असं मत पडलं की तिथली मतं उद्धव ठाकरेंकडे जातील. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार उभा केला आहे. पण आमची आधीपासून भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर पाठिंबा मागितला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. आमचं कालही हेच मत होतं आणि आजही हेच मत आहे. सदा सरवणकरांबाबत आम्ही बसून बोलू तेव्हा ठरवू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Prithviraj Chavan on Ajit Pawar: अजित पवारांच्या चौकशीचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

“सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे यातले जास्तीत जास्त बंडखोर परत आपल्या बाजूला कसे आणता येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल”, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीसांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असंही नमूद केलं. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये महायुतीच्याच मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याचं दिसणार आहे.