अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. दरम्यान राज ठाकरेंच्या या पत्राबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Andheri Election: विनायक राऊतांकडून राज ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “हीच आपली संस्कृती, मात्र…”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”

“राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असताना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल”, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटले?

“दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.