मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, कोणालाही पाठीशी घालण्यात येऊ नये, अशी मागणी पीडित देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर याप्रकरणी कोणालाही सोडणार नाही आणि सर्व गुन्हेगारांना कठोर शासन होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांना दिली. देशमुख यांचे बंधू धनंजय आणि कुटुंबीय, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा आदींनी फडणवीस यांची ‘सागर’ बंगल्यावर मंगळवारी रात्री भेट घेतली व सुमारे तासभर चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांची नियुक्ती केली आहे. पण त्यात बीड व केज पोलीस ठाण्यातील स्थानिक उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. खंडणीप्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराड याचे ‘एसआयटी’तील काही कर्मचाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप व छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहेत. त्यामुळे ही ‘एसआयटी’ कराडविरोधात कसा तपास करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एसआयटी आणि याप्रकरणात देशमुख कुटुंबीयांकडे उपलब्ध असलेले पुरावे, प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) नोंदविलेल्या बाबी, आरोपींचे मोबाईल तपशील, सीडीआर आदी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

हेही वाचा >>>मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका

याप्रकरणी नि:पक्षपातीपणे तपास करण्यात यावा आणि सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर देशमुख कुटुंबीयांना योग्य वाटतील, अशी पोलीस अधिकाऱ्यांची नावे सुचविल्यास त्यांचा समावेश ‘एसआयटी’मध्ये करण्यात येईल. कोणालाही सोडण्यात येणार नाही. बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड केला जाईल, असे फडणवीस यांनी बैठकीत स्पष्ट केले.

नि:पक्षपातीपणे तपास व्हावा

बीड जिल्ह्यात खंडणीसाठी उद्याोजकांना धमक्या दिल्या जातात, अशी तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर उद्याोजकांबरोबरही चर्चा करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे व अन्य बाबी मुख्यमंत्र्यांना दाखवून चर्चा केली. याप्रकरणी नि:पक्षपातीपणे तपास व्हावा आणि सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, अशी आमची भूमिका त्यांच्यापुढे मांडल्याचे धनंजय देशमुख यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.