पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? असे ते म्हणाले होते. दरम्यान, राहुल गांधीच्या या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे?…

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. मात्र, बाल हक्क न्यायालयाने यासंदर्भातील तो निर्णय घेतला. त्यावर अपील करून पोलिसांनी हे प्रकरणी पुन्हा बाल हक्क न्यायालयात आणले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या घटनेचं राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून बघणं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राहुल गांधी यांनी नीट माहिती घेतली असती, तर अशाप्रकारे त्यांनी विधान केलं नसतं, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

पुण्यातील अपघातावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती.“बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते. परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला १७ वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते”, असं राहुल गांधी म्हणाले होते.

पुढे बोलताना “निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही?” असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला होता. तसेच “गरीब असो अथवा श्रीमंत, प्रत्येकाला सारखा न्याय मिळायला हवा. यासाठीच आम्ही लढत आहोत, न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढतोय. यांच्या (सत्ताधाऱ्यांच्या) अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

हेही वाचा – “देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?” ‘त्या’ विधानावरून अनिल देशमुखांचा सवाल!

अल्पवयीन आरोपीला दिले होती निबंध लिहण्याचे निर्देश

दरम्यान, रविवारी पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर राहून वाहतुकीचे नियम शिकवण्याचे तसेच अपघातावर ३०० शब्दांत निबंध लिहायला लावण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती.