शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपा असा थेट संघर्ष विधानसभेमध्ये पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “हा दाऊद आहे कुठे? निवडणुकीसाठी हा विषय किती काळ वापरणार? तुम्ही आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार का?, विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ईडी’ आहे की तुमचा घरगडी?” अशी टीका करत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी थेट युक्रेन युद्धाचा संदर्भ दिला.
मुख्यमंत्र्याचे टोमणे आणि टोले…
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचे आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर देणारे भाषण केले. गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफटत आणण्याची घोषणा केली होती. पण आता दाऊदच्या मागे आपण फरफटत चाललो आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ओसामा बिन लादेनच्या नावाने मते मागितली नाहीत, तर त्यांनी घरात घुसून लादेनला ठार केले, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. अशाप्रकारचे अनेक टोमणे आणि टोले उद्धव यांच्या भाषणामध्ये होते.
नक्की पाहा >> Photos : “वाटल्यास मला तुरुंगात टाका, पण…”, “सत्ता हवी आहे ना तर…”; मुख्यमंत्र्यांचं भाजपाला आव्हान
शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत…
मात्र याच भाषणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मूळ मुद्दे बाजूला ठेवत शिवाजीपार्कवरील भाषण केल्याचा टोला उद्धव यांना लगावला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील चर्चेला मुद्देसूद उत्तर द्यायला हवे होते. पण त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले. प्राणवायू खरेदीतील भ्रष्टाचार, यशवंत जाधव यांनी गोळा केलेली बेहिशेबी संपत्ती, २१ कोटी रुपयांची टॅब खरेदी अशा विविध विषयांवर त्यांनी उत्तर दिलेले नाही,” असं फडणवीस म्हणाले.
तुम्ही म्हणजे मुंबई नाही…
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोविड काळात २४ महिन्यांत अनेक मालमत्ता खरेदी केल्या यावर ते काहीही बोलले नाहीत. तुमच्या घर-गाडय़ांवर कारवाई होत आहे म्हणून ईडीचा त्रास होतो. मुळात तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
युक्रेननं मुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी…
उद्धव ठाकरेंच्या भाषणामधील टोमण्यांचा संदर्भ घेत फडणवीस यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर उपहासात्मक टीका केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. “माझं तर असं मत आहे की आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालेलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे नेटो राष्ट्रांची मदत मागत आहेत लढण्याकरता. त्यांनी नेटो राष्ट्रांची मदत मागण्यापेक्षा आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण आमच्या एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे जो सगळ्यांवर भारीय. तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब,” असं फडणवीस यांनी म्हणताच भाजपाचे सर्व आमदार हसू लागले.
“मुख्यमंत्र्यांच्या भाषणात टोमणे सोडून बाकी काय आहे. त्यांचे भाषण म्हणजे अरण्यरुदन होते,” असा चिमटा फडणवीस यांनी काढला.
ईडी आहे की घरगडी?
नवाब मलिकांवर तथ्यहीन आरोप केले जातात. केंद्रीय संस्था एवढय़ा पोकळ झाल्या आहेत का? नवाब मलिक दाऊदचे हस्तक होते तर आधीच कारवाई का झाली नाही? ते सातत्याने निवडून येत असताना या यंत्रणांना काहीच कसे कळले नाही. केंद्रीय यंत्रणा तेव्हा काय करत होती? दिवे लावत होती का? की थाळय़ा वाजवत होती? बाण लक्ष्यवेध करणारे हवेत, पण आता हे बाण हातात धरून खुपसले जात आहेत. ईडी एवढी बेकार आहे का, की ती तुम्ही दिलेल्या माहितीनुसार चौकशी करत आहे. ती ईडी आहे की घरगडी? काहीच कळत नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
फडणवीस यांनी दिलं उत्तर
तुमच्या घर-गाडय़ांवर कारवाई होत आहे म्हणून ईडीचा त्रास होतो. मुळात तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस