राज्यामधील सत्तासंघर्ष आणि अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मंगळवारी ‘ढाल-तलवार’ (एक ढाल, दोन तलवारी) चिन्ह दिले. पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा केल्यास शिंदे गटाला नव्या चिन्हाचा वापर करता येईल, असे आयोगाने आदेशपत्रात स्पष्ट केले. हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसहीत शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त करताना हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून या चिन्हासंदर्भात बोलताना तलवार ही गद्दारीची असून ढाल भारतीय जनता पार्टीची असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाला दिलेल्या चिन्हावरुन झालेल्या या टीकेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> “नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल, स्वत:च्या जातीचा उल्लेख केल्यावरुनही पंतप्रधानांना टोला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा