महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. पुढच्या आठवड्यातच निवडणूक होणार आहे. २० तारखेला मतदान होणार आहे तर २३ तारखेला निकाल लागणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याआधी प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आपल्याकडे काही लोक फेसबुक लाइव्ह करुनही काही लोक उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले. पण आज मी काही लोकांचे आभार मानतो कारण मोदींच्या नेतृत्त्वात मागच्या दोन्ही सरकारांनी म्हणजेच महायुती १ आणि महायुती २ मुंबईचा चेहरा बदलून दाखवला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

आम्ही मुंबईचा चेहरा बदलून दाखवला आहे-फडणवीस

मुंबईचा चेहरा बदलला म्हणजे काय? तर मुंबईकरांचा ६० टक्के वेळ हा प्रवासात जातो तर आम्ही रेल्वेचा चेहरा बदलला. आघाडी सरकारने ११ वर्षांत ११ किमीची मेट्रो तयार केली. मात्र महायुती सरकारने ३५० किमी मेट्रोचं जाळं उभारलं. कोस्टल रोड उभा केला. २२ किमीचा अटल सेतू बांधला त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली. प्रवास सुकर व्हावा म्हणून आम्ही हे सगळं केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- BJP : ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?

मुंबईकरांच्या घराचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे

बीडीडी चाळीचं पुनर्वसन, अभ्युदय नगरचं पुनर्वसन, धारावीचा विकास करणं या गोष्टी आपण करुन दाखवल्या. मुंबईकरांच्या घराचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. मध्यमवर्गीय, गरीब मोदींच्या आशीर्वादाने आपण या गोष्टी करणार आहे. माझा धारावीचा माणूस पक्क्या चांगल्या आणि सुंदर घरात बसलेला पाहण्यास मिळेल. मोदींच्या प्रेरणेतून आपण १८ निर्णय घेतले आणि १६०० प्रकल्प येत आहेत. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून १०० स्क्वेअर फुटांच्या घरात राहणाऱ्या माणसाला ५०० स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींच्या नेतृत्वातल्या महायुतीने काम करुन दाखवलं आहे.

माझा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला सवाल आहे

माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार यांना आणि काँग्रेसला आहे. लांगुलचालनाचं राजकारण किती दिवस करणार आहात? उलेमांच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्ही वाचल्या होत्या का? कारण त्यात एक मागणी होती की २०१२ ते २०२४ या कालावधीत दंगली झाल्या त्या दंगलीमधल्या आरोपींना सोडून देण्याची मागणी महाविकास आघाडीने मान्य केली. हे कसं काय घडू शकतं? ही तुम्ही वाचली तरी होती का? हे लोक व्होट जिहाद करणार असतील आम्हाला व्होट धर्मयुद्ध करावं लागेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.