राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थित राहिले आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे सांगितले. तसेच सर्व सविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा >> तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर; पश्चिम बंगालमधील राजकारण तापले
“आता आपले सरकार आहे. आपले सकार आल्यानंतरर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, की आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> “या बालिशपणात मला…”, आदित्य ठाकरेंचा वरळीतील दहीहंडीवरून भाजपाला खोचक टोला!
शिवसेना हिंदू सणांना विसरली
दरम्यान दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. हिंदू सणांसोबत भाजपा आहे आणि शिवसेना या सणांना विसरली आहे, हे सर्वांना समजले आहे. वरळीच काय पूर्ण मुंबईत भाजपाचे कमळ फुलणार आहे. वरळीचा आमदारदेखील भाजपाच्याच मताने निवडून आला आहे. शिवसेनेने हिंदुत्वाला कधीच सोडले आहे, अशी घणाघती टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.