मुंबई : ‘‘मी कायम नैतिकतेचे पालन करीत राजकारण करीत आहे. मात्र, राजकारणात टिकून राहायचे असेल, तर काही वेळा अनैतिक (अनएथिकल) गोष्टी कराव्या लागतात. हे प्रमाण मात्र १०-२० टक्के आहे’’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडियन एक्सप्रेस आयडिया एक्सचेंज’कार्यक्रमात बुधवारी केले. लोकसभेची कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढवेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘‘महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील, याविषयी शंका आहे. सत्ता हे एकत्र ठेवण्याचे साधन असते. तीनही पक्षांना विरोधी पक्षात राहणे कठीण जाते. त्यामुळे ते एकत्रित निवडणुका लढतील का, हे सांगता येणार नाही. मात्र, भाजप-शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणुका लढवेल. शिंदे यांच्याबरोबर आमची नैसर्गिक युती आहे. शिंदे गट हा शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवेल, भाजपच्या चिन्हावर नाही’’, असे फडणवीस यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे जे मुख्यमंत्री असतात, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातात, असेही ते म्हणाले.

‘‘राजकारणात अनैतिक गोष्टी कराव्या लागल्या, तरी काँग्रेस, एमआयएम, मुस्लिम लीग यांच्या विचारधारा वेगळय़ा असल्याने त्यांच्याशी कधीही तडजोड करणार नाही’’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘‘शिंदे यांना जनतेने स्वीकारण्यास सुरुवात केली असून, ते राज्यभरात फिरत आहेत. ‘शासन आपल्या दारी’सह वेगवेगळय़ा योजना, उपक्रम आणि जनहिताचे निर्णय या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. शिंदे यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आमच्यात योग्य समन्वय असून, वृत्तपत्रातील जाहिरातींवरून काही चर्चा झाल्या, तरी युतीला काहीच फरक पडलेला नाही’’, असे फडणवीस यांनी नमूद केले.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

‘राजकारणात मोठा त्याग करावाच लागतो आणि सहनशीलताही महत्त्वाची असते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मी पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी त्याग करण्याची आणि मंत्रिपदे, महामंडळांची मागणी न करण्याची सूचना केली. जाहिरातींच्या मुद्दय़ावरुन भाजप कार्यकर्त्यांकडून काही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पण, काही वेळा कार्यकर्त्यांना हे समजत नाही किंवा त्यांची तेवढी सहनशीलता नसते. आपल्या नेत्यावर अन्याय झाला किंवा आमचा नेता अधिक वरचढ, अशी त्यांची भावना असते. पण आम्ही त्यांची समजूत घातली’’, असे फडणवीस यांनी सांगितले.

आयपीएल सामन्यांना पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था पुरविण्याच्या खर्चापोटीचे दर कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविषयी फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबईत आयपीएलचे अधिक सामने व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, कमी केलेले दरही अन्य राज्यांच्या तुलनेत अधिकच आहेत. सुरक्षा खर्चाची रक्कम भारतीय क्रिकेट मंडळाकडून वसूलच होत नाही. मुंबईत अधिक सामने झाले, तर त्यानिमित्ताने ते पाहायला अन्य देशभरातून व परदेशातूनही क्रिकेटरसिक येतात आणि आर्थिक उलाढाल वाढून राज्य सरकारचा महसूलही वाढतो.’’

शिंदे हे ‘बॉस’!

‘‘मी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे सरकार चालवले असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरिष्ठ (बॉस) म्हणून स्वीकारले आहे. मात्र, ते माझे वरिष्ठ असल्याचे आपल्या वागण्यातून कधीही जाणवू देत नाहीत. आमच्यात योग्य समन्वय आहे. मी राजशिष्टाचाराचे कायम पालन करतो’’, असे फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader