मुंबई : ‘‘मी कायम नैतिकतेचे पालन करीत राजकारण करीत आहे. मात्र, राजकारणात टिकून राहायचे असेल, तर काही वेळा अनैतिक (अनएथिकल) गोष्टी कराव्या लागतात. हे प्रमाण मात्र १०-२० टक्के आहे’’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडियन एक्सप्रेस आयडिया एक्सचेंज’कार्यक्रमात बुधवारी केले. लोकसभेची कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनाच (शिंदे गट) लढवेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘‘महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील, याविषयी शंका आहे. सत्ता हे एकत्र ठेवण्याचे साधन असते. तीनही पक्षांना विरोधी पक्षात राहणे कठीण जाते. त्यामुळे ते एकत्रित निवडणुका लढतील का, हे सांगता येणार नाही. मात्र, भाजप-शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणुका लढवेल. शिंदे यांच्याबरोबर आमची नैसर्गिक युती आहे. शिंदे गट हा शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवेल, भाजपच्या चिन्हावर नाही’’, असे फडणवीस यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे जे मुख्यमंत्री असतात, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातात, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा