मुंबई : भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीचे कार्यकर्ते खांद्यावर भगवे झेंडे मिरवत, घोषणाबाजी करीत गुरुवारी सकाळपासूनच आझाद मैदानाच्या दिशेने निघाले होते. हळूहळू आझाद मैदानाच्या आसपासचा परिसर गर्दीने फुलून गेला. गळ्यात भगवे शेले, डोक्यावर भगव्या टोप्या आणि महायुतीचा जयघोष करीत कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे आझाद मैदान परिसरात दाखल होत होते. मात्र त्याच वेळी आझाद मैदान परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने, तसेच कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नोकरदारांना संध्याकाळी घरी परतताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यासाठी बेस्ट बसचा ताफा तैनात करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. तर लोकलमध्येही प्रचंड गर्दी झाली होती.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विशेष तयारी सुरू होती. प्रत्यक्ष शपथविधीच्या दिवशी सकाळपासूनच या परिसरात महायुतीच्या घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. तासागणिक ही गर्दी वाढत होती. सीएसएमटी स्थानकातून लोकलमधूनही कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेने जात होते. सीएसएमटी स्थानकाजवळच्या भूमिगत मार्गातील दुकाने आदल्या दिवशीच बंद करण्यात आली होती. तर या परिसरातील सगळ्या फेरीवाल्यांनाही हटवण्यात आले होते. खाद्यपदार्थांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात रोज कामानिमित्त येणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. तसेच सीएसएमटी ते चर्चगेट या मार्गावरील बसगाड्या या शपथविधी कार्यक्रमासाठी घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस वाहतुकीवरही परिणाम झाला. बसस्थानकांवर प्रवासी अडकून पडले होते. तर संध्याकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सीएसएमटी स्थानकाच्या दिशेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाली होती. मैदानातून लोंढ्याने बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. संध्याकाळी घरी परतणारे नोकरदार या गर्दीत अडकले होते. तसेच महापालिका मार्गावरून जाणारी वाहतूकही अक्षरश: मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होती. त्यामुळे आझाद मैदान परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पुढे बराच वेळ होती.

Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
minor boy killed by father and brother over talking to girl
पुणे : अल्पवयीन मुलाची हत्या; मुलीशी बोलत असल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
youth pistols Marathwada marathi news
सत्ता, श्रीमंती मिरवण्यासाठी कंबरेला पिस्तूल, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात लाखोंची ‘हौस’

हेही वाचा – मुंबई पोलिसांवर अंबिवली गावात दगडफेक, सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी जमावाचा हल्ला

‘एक है तो सेफ है’ आशयाचे टी-शर्ट आणि ‘कमळ’ पक्षचिन्हाच्या साड्याउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक है, तो सेफ है’ ही घोषणा गाजली. या घोषणेच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्ते ‘एक है तो सेफ है’ असे नमुद केलेले टी-शर्ट घालून महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचले होते. तसेच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ पक्षचिन्ह असलेल्या भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. तसेच महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात आपापल्या पक्षाचे शेले, खिशाला पक्षचिन्हाचा बिल्ला, रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आणि हातात झेंडे घेऊन हजेरी लावली होती. तसेच शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे फेटे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबी फेटे घालून हजेरी लावली होती.

घोषणाबाजीने आझाद मैदानचा परिसर दुमदुमला

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी बहुसंख्येने कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी ‘एक है तो सेफ है’, जय श्री राम, भारत की जय, वंदे मातरम आदी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अनेक कार्यकर्ते हे कच्छी बाजा आणि ढोल – ताशांच्या तालावर शपथविधी स्थळी पोहोचले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसोक्तपणे नाचत आनंद व्यक्त केला. तसेच अजित पवार यांच्या सांगलीतील समर्थकांनी पारंपरिक नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक कार्यकर्ते फोटो, चित्रफित आणि सेल्फी काढण्यात मग्न झालेले पाहायला मिळाले. तसेच शपथविधी सोहळा संपल्यानंतर महायुतीतील पक्षांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल – ताशा वाजवत जल्लोष केला.

माजी मंत्री, आमदार आणि मान्यवरही वाहतूक कोंडीत अडकले

महायुती सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी उपस्थिती केली होती. यावेळी राज्यातील माजी मंत्री आणि आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या (व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी) आगमन मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ‘व्हीआयपी’ प्रवेशद्वार क्रमांक पाचमधून आझाद मैदानात प्रवेश करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मार्गावर माजी मंत्री, आमदार आणि इतर मान्यवरांच्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळपास १५ ते २० मिनिटे ही वाहने एकाच ठिकाणी थांबून संथगतीने पुढे मार्गक्रमण करत होती. या सर्वांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी पदपथांच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यामुळे शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने माजी मंत्री, आमदार आणि विशेष अतिथीही वाहतूक कोंडीत अडकले होते.

मुंबईचे डबेवाले महायुती सरकारच्या शपथविधीला हजरमुंबईमधील ठिकठिकाणच्या कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जेवणाचा डबा नित्यनियमाने पोहोचविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनच्या सदस्यांनी भाजपच्या समर्थनार्थ आपल्या पारंपारिक पोशाखात हजेरी लावली होती.

हेही वाचा – जे.जे. रुग्णालयाच्या परिचर्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी डॉक्टरची नियुक्ती

रस्त्याच्या दुतर्फा झेंडे आणि फलकबाजीमहायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने आझाद मैदान परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिका मार्ग परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि घटक पक्षांचे झेडे मोठ्या प्रमाणात लावले होते. तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी शुभेच्छापर फलकबाजी केली होती. महाराष्ट्र आता थांबणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या फलकांवर ‘संयमाला तुझ्या वेगळीच धार, सोसलेस तू अगणित वार’; ‘कधी न केला पलटवार, महाराष्ट्राच्या प्रगतीचाच केला दिनरात विचार’ आदी आशय असलेले फलकही ठिकठिकाणी लावले होते. तर विशेष बाब म्हणजे मुंबई लोकलमधील छोटेखानी स्क्रीनवरही शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणाची जाहिरातबाजी करण्यात आली होती.

अनेक प्रवेशद्वारांवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, वाहतूक कोंडी आणि नाक्यानाक्यावर गप्पांचे फड

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीतील सर्व पक्षांचे काही कार्यकर्ते खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून आले होते. मुंबईबाहेरील कार्यकर्ते बसगाड्यांनी आझाद मैदानावर पोहोचले होते. त्यामुळे आझाद मैदान परिसरासह मुंबईतील काही रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, रेल्वे स्थानकांवरही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक कार्यकर्त्यांकडे शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका होत्या, मात्र प्रवेशद्वारांवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. आपापल्या निमंत्रण पत्रिकेवर नमूद असलेले प्रवेशद्वार शोधत कार्यकर्ते फिरत होते. तर काही कार्यकर्त्यांकडे निमंत्रण पत्रिकाच नसल्यामुळे अनेकजण आपापल्या वरिष्ठ नेत्यांची वाट पाहत उभे होते. शपथविधी समारंभ सुरू होण्यापूर्वी आझाद मैदान परिसरात राजकीय गप्पांचे फड रंगले होते.

Story img Loader