मुंबई : Maharashtra CM Oath Ceremony Updates निर्विवाद बहुमताची ‘दुर्मीळ चीज’ महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीकडे सोपवल्यानंतरही १३ दिवस निव्वळ सत्तेचे तंबोरे लावण्यातच गेले… पीळ तर इतका वाढला की आता तारा तुटतात की काय अशीही कुजबूज सुरू झाली… पण अखेर सूर जुळले! पाच डिसेंबरच्या गुरुवारी, पंतप्रधान आणि जनसमुदायाच्या साक्षीने आणि अर्थातच राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला पाच वर्षांच्या खंडाने लाभलेल्या स्थिर सरकारची मैफल जमली आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी जुगलबंदी सोडून एकदिलाने तीन तालात आळवलेला सत्तेचा बडा खयाल आता किती रंगतो याची उत्सुकता वाढली…

पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण करणारे राज्यातील दुसरे मुख्यमंत्री आणि सर्वात कमी काळ पद भूषवणारे मुख्यमंत्री अशा दोन परस्पर टोकाच्या भूमिका बजावल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तिसरा कार्यकाळ गुरुवारी सायंकाळपासून सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, नेत्यांनी गजबजलेल्या भव्य व्यासपीठाच्या साक्षीने आणि उद्याोगपती, कलावंत, क्रीडापटूंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या शेकडोंच्या गर्दीसमोर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच शपथविधी पार पडला.

Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
eknath shinde and popat dhotre friendship news
‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा

हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता

महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर शपथविधी मोठ्या जल्लोषात करण्यात आला असला तरी मंत्र्यांची संख्या आणि खात्यांचे वाटप यावरून तिन्ही घटक पक्षांमध्ये सहमती न होऊ शकल्याने तिघांनीच शपथ घेतली. त्यामुळे अवघ्या २० मिनिटांत हा सोहळा आटोपला. फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले शिंदे दुसरेच. आझाद मैदानावरील या शपथविधी सोहळ्यात २० पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्याची मूळ योजना होती. मात्र, एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यातच बराच वेळ गेला. यामुळे मंत्र्यांची संख्या व खात्यांचे वाटप यावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. खातेवाटपावर शिंदे अडून बसल्याने राष्ट्रवादीनेही आपली भूमिका उघड केली नाही.

या दोन्ही पक्षांशी चर्चा करून महायुतीची एकी कायम ठेवण्याचे पहिले आव्हान फडणवीस यांना पेलावे लागणार आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या आपल्या घोषणेचा पुनरूच्चार केला. जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षेचे ओझेही अधिक आहे. मात्र येत्या काळात लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. निवडणुकीच्या दरम्यान लोकांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकार करेल. मात्र त्यापूर्वी राज्याची वित्तीय स्थिती विचारात घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

थकलेली देहबोलीसावरण्याचे आव्हान

मुंबई : शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार घेऊन बाहेर पडल्यापासून आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना टोलावून लावलेल्या एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत आपल्या शिवसेनेची बांधणी घट्ट केली. याच आत्मविश्वासाने निवडणुकीतही यश मिळवले. मात्र, यशाचा परिपाक असलेल्या शपथविधीच्या झगमगाटात शिंदेंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास फिका पडला होता. देहबोलीतील हा थकवा आजारपणामुळे की राजकीय अस्वस्थतेमुळे, याची चर्चा सुरू होती.

महायुती सरकारमध्ये आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी गेल्या अडीच वर्षांत राज्याने विकासाची जी गती घेतली आहे, त्याच गतीने महाराष्ट्र पुढे जाईल. महाराष्ट्र आता थांबणार नाही तर सर्व क्षेत्रांत राज्य अग्रेसर राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा, गती आणि समतोलदेखील तोच राहील. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader