मुंबई : दावोसमधील जागतिक गुंतवणूक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी पहाटे मुंबईतून रवाना होणार आहेत. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल यादृृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात मोठी देशी व परकीय आर्थिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने फडणवीस यांचा दावोस दौरा महत्त्वपूर्ण आहे. फडणवीस यांच्या २०१४-१९ या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते तीन वेळा या परिषदेत सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यकाळात औद्याोगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला होता. या कार्यकाळात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे आयोजन दोन वेळा करण्यात आले होते. या दौऱ्यात उद्याोगमंत्री उदय सामंत, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडकोचे अधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. यंदा दावोसमध्ये सात लाख कोटींच्या आसपास गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>> पालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी टोकन सुविधा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

रोजगारनिर्मितीला गती

●डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्याोग, औषधी आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात अनेक सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत.

●महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सवर नेण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असून त्यातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्टही साध्य केले जाणार आहे.

●राज्य सरकारने उद्याोगवाढीसाठी विविध प्रकारची धोरणे नुकतीच जाहीर केली आहेत. त्याविषयी फडणवीस या परिषदेत उच्चपदस्थांना माहिती देणार असून राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आम्ही समतोल विकासावर भर दिला आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल आणि सर्व विभागांमध्ये व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री

Story img Loader