मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असून व्यक्ती घरात असताना घरे व मालमत्ता जाळणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. हिंसेच्या घटनांमध्ये काही राजकीय नेते व कार्यकर्तेही सामील आहेत. बीडच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नसून जाणीवपूर्वक हिंसा करण्याचे प्रयत्न सहन करणार नाही आणि पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली असून यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पावले उचलत आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पण तरीही काही व्यक्ती या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बीडमध्ये काही व्यक्तींनी लोकप्रतिनिधींची घरे जाळली, विशिष्ट समाजाच्या लोकांना लक्ष्य केले, काहींची हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठाने जाळण्यासाठी सूचना दिल्या गेल्या. याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. व्यक्ती घरात असताना घरे जाळण्याचे प्रयत्न झाले, त्याच्या ध्वनिचित्रफिती पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यावरून ५०-५५ जणांची ओळख पटली असून उर्वरित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या सर्वावर जिवे मारण्याचा प्रयत्न (भारतीय दंडविधानातील कलम ३०७) या गुन्ह्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.
हेही वाचा >>>माविआचे आमदार रवींद्र धंगेकर यांची सत्ताधारी आमदारांच्या विरोधात कोर्टात धाव! ‘हे’ आहे कारण
हिंसेला थारा नाही
शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सर्वाना अधिकार असून अशा आंदोलकांवर पोलीस कारवाई करणार नाहीत. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. पण हिंसेला कोणत्याही परिस्थितीत सरकार थारा देणार नाही. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून ती अनेक संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. हिंसा करणाऱ्यांना अटक होईपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील. हिंसेला चिथावणी देण्यात काही राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सामील असून त्याबाबतच्या ध्वनिचित्रफिती व अन्य पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ओबीसी नेत्यांना समाजमाध्यमांवरुन धमक्या देण्यात येत असून तेही गांभीर्याने घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अमित शहांची फडणवीसांशी चर्चा
मराठा आरक्षणावरून आंदोलन आणि हिंसाचाराची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारनेही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन
‘उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी’
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच काळात मराठा आरक्षण रद्द झाले, त्यांना मराठा आरक्षण टिकविता आले नाही. ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असून त्यांना आता आरक्षणावर बोलण्याच्या नैतिक अधिकारही नसल्याचे जोरदार टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सोडले.
मराठा आरक्षणाबाबत सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा प्रत्यारोप शिंदे यांनी केला.