‘विठ्ठलराव रत्नपारखी प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा प्रकाश देशमुख स्मृती पुरस्कार यावर्षी ‘लोकसत्ता’चे चंद्रपूर येथील प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांना जाहीर झाला आहे.  दिवंगत पत्रकार प्रकाश देशमुख यांच्या नावाने दरवर्षी पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. यंदा ्र गावंडे यांना नक्षलवादाबद्दल धडाडीने केलेल्या पत्रकारितेबद्दल प्रकाश देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येत आहे. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजता इंडियन र्मचट चेंबरच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात गावंडे यांना पुरस्कार वितरण होईल. यावेळी ‘निवडणुकांचे अर्थकारण, राजकीय भ्रष्टाचार व सरकारी खर्चाने निवडणुका’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.

Story img Loader