राज्यात गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्यात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले जलसंपदा सचिव देवेंद्र शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रथमच सनदी सेवेतील प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंचन घोटाळ्यात शिर्के प्रमुख संशयित असल्याचा आरोप विजय पांढरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिर्के यांच्यासह जलसंपदा खात्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर सिंचनावरील श्वेतपत्रिका काढणारच असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र ही श्वेतपत्रिका शिर्के तयार करणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू होती. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे प्रथमच एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती कऱ्ण्यात आली असून व्ही. गिरीराज हे अत्यंत कडक शिस्तीचे असल्याने या विभागातील भ्रष्टाचार खणून काढण्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जाते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा