मुंबई : भाविकांनी सात दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. बुधवारी पहाटेपर्यंत १४ हजार ८४५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आता दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जन सोहळ्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे.
करोनामुळे गेली दोन वर्षे घालण्यात आलेली निर्बंध हटविल्यानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील अवघे वातावरण गणेशमय झाले आहे. भाविक मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडलांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावत आहेत. ठिकठिकाणच्या मंडपस्थळी भाविकांची प्रचंड होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सोमवारी सात दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. बुधवारी पहाटेपर्यंत एकूण १४ हजार ८४५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी४१७५ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
मुंबईत दरवर्षी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यावर्षी सात दिवसांच्या गणेशमूर्तींची संख्या कमी होती. यंदा टाळेबंदी नसल्यामुळे दहाव्या दिवशी विसर्जन सोहळ्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येते. मुंबईत ११ हजार सार्वजनिक मंडळे आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनेही विसर्जन सोहळ्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या तयारीबाबत ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे –
महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष.
प्रमुख विसर्जनस्थळी ७८६ जीव रक्षक तैनात.
नैसर्गिक विसर्जनस्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफ्याची व्यवस्था.
प्रमुख विसर्जनस्थळी २११ स्वागत कक्ष.
तीन हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था.
महत्त्वाच्या विसर्जनस्थळी वैद्यकीय सामग्रीसह सुसज्ज १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका.
विसर्जनस्थळी ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने.
सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरिक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे.
महत्त्वाच्या विसर्जनस्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.
गणेशमूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत यासाठी चौपाट्यांवर ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था.
मुंबई महानगरपालिकेचे संबंधित १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात.