श्रावण महिन्यापासून महाराष्ट्रात सणांची रेचचेल सुरु असते. या सर्व सणांमध्ये प्रत्येकाचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. श्रावण संपताच प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते. मुंबईमध्ये तर गणेशोत्सव म्हणजे धमाल. मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत कोणतीही कसर सोडत नाहीत. परंतु करोना महामारीमुळे सर्वच उत्सवांचे स्वरूप बदलले. आणि या बदलांची सुरुवातच झाली आहे बाप्पाच्या मूर्तीपासून. गेल्या दीड वर्षाच्या काळात मातीच्या गणेशमुर्त्या विकत घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सध्या इको फ्रेंडली ही संकल्पना ट्रेंडमध्ये आहे. तसेच निर्बंधांचे पालन करताना लोकांना या मूर्ती सोयीच्या असतात. याबद्दल स्वतः मूर्तिकार वीरेंद्र केळस्कर आणि त्यांचे वडील सुरेंद्र केळस्कर काय सांगत आहेत पाहुयात…

लोकांना उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे लागत आहे. पण तरीही लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. या निर्बंधांसोबतच लोक सकारात्मक दृष्टिकोनातून हे बदल सुद्धा स्वीकारत आहेत हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यांमुळे या करोना काळात ही एक चांगली गोष्ट घडली आहे असे म्हणता येऊ शकते. ही परंपरा या पुढेही चालत राहावी अशीच आशा आहे.

Story img Loader