मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्रास ज्येष्ठ साहित्यिक धनंजय कीर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी साहित्य क्षेत्रात चरित्रकार धनंजय कीर यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा जन्म रत्नागिरीचा असल्याने विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्रास ‘पद्माभूषण स्व. धनंजय कीर विद्यापीठ उपकेंद्र’ असे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, असे निवेदन युवासेना व्यवस्थापन परिषदेच्या प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी जानेवारी महिन्यात विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. गुरुवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभेमध्ये हा नामकरण प्रस्ताव मंजूर करण्यात आला.