काकाने राजकीय वारस म्हणून मुलीला पुढे आणल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बडी नेतेमंडळी गुरुवारी विधान भवनात उपस्थित होती.
धनंजय मुंडे यांनी भाजप आमदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक होत आहे. मुंडे हे आता राष्ट्रवादीकडून लढत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नारायण राणे आणि डॉ. पतंगराव कदम ही काँग्रेसची बडी नेतेमंडळी उपस्थित होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सारेच नेते याप्रसंगी उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांना महत्त्व देत राष्ट्रवादीने मुद्दामहून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.