अशोक अडसूळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : राज्यातील १२ लोकसभा मतदारसंघात निर्णायक मते असलेला धनगर समाज २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना युतीबरोबर होता. या लोकसभेला मात्र धनगर समाजाने महायुतीकडे पाठ फिरवत आपला रोष प्रकट केला आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १२ धनगरबहुल मतदारसंघात ११ ठिकाणी महायुतीला पराभवास सामोरे जावे लागले आहे.
राज्यात धनगर समाजाच्या लोकसंख्येची टक्केवारी ९ टक्के मानली जाते. माढा, सोलापूर, सांगली, बारामती, परभणी, बीड, अहमदनगर, धाराशिव, कोल्हापूर आणि हातकणंकले या १२ लोकसभा मतदारसंघात व त्याअंतर्गत असलेल्या ७२ विधानसभा मतदारसंघात हा समाज २२ ते २९ टक्के आहे, असे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचने केलेले सर्वेक्षण सांगते. या सर्वेक्षणानुसार राज्यात धनगर समाजाचे मतदार १ कोटी ९ लाख असल्याचा दावा केला जातो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनगरबहुल १२ मतदारसंघातील बारामती वगळता ११ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या.
हेही वाचा >>>‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
यावेळी धनगरबहुल लोकसभा मतदारसंघात नेमके उलटे चित्र आहे. फक्त हातकणंगले वगळता सर्वच्या सर्व ११ मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडाला आहे. धनगर समाजाच्या विकासात शरद पवार यांनी आडकाठी घातली, धनगरांना आदिवासी आरक्षण न देता भटक्या जमाती (क) चे आरक्षण पवार यांनीच जाणूनबुजूण दिले, असे चित्र गेली काही वर्षे निर्माण केले होते. आश्चर्य म्हणजे धनगरबहुल मतदारसंघात यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार विजयी झाले आहेत. धनगर समाजाचे नेते व ‘रासप’ पक्षाचे प्रमुख असलेल्या महादेव जानकर यांना महायतीकडून परभणीतून उमेदवारी दिली होती. तसेच धनगर समजाचे दुसरे नेते प्रकाश शेंडगे सांगलीतून अपक्ष उभे राहिले होते. मात्र या दोघा धनगर नेत्यांचा यावेळी मोठा पराभव झाला आहे. यासंदर्भात यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांनी सांगितले की, आदिवासी आरक्षण देण्यात भाजपला आलेले अपयश, धनगर आरक्षण याचिकेत महायुती सरकारचे असहकार्य आदींमुळे धनगर समाजाने या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रोष व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीत धनगर समाजाने भाजपकडे पाठ फिरवल्याने ‘माळी-धनगर-वंजारी’ हे सूत्र आता मोडीत निघाले आहे.
नगरबहुल मतदारसंघात महायुतीला यावेळी फटका बसला हे खरे आहे. मात्र तीन ‘म’ एकत्र आल्याने बसला आहे. ‘मुस्लीम-मराठा- बौद्ध’ हे मतदार यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूला आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धनगरबहुल मतदारसंघात यावेळी धनगर मते निष्प्रभ ठरली. – महादेव जानकर, परभणीतील पराभूत उमेदवार.