Dharavi Assembly constituency 2024 Congress vs Shivsena : धारावी हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. १९७८ साली हा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यापाठोपाठ त्यांची कन्या वर्षा गायकवाड या सलग चार वेळा येथून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र वर्षा गायकवाड उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. तर, शिवसेनेचे (ठाकरे गट) अनिल देसाई हे दक्षिण-मध्य लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे यंदा या मतदारसंघाला नवीन आमदार मिळणार आहे. धारावी मतदारसंघ काँग्रेसने मजबूत बांधला असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ सोपा पेपर ठरू शकतो.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांनी माजी खासदार व शिवसेचे (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांचा या मतदारसंघात पराभव केला आहे. देसाई यांच्या विजयात धारावी विधानसभेचा मोठा वाटा आहे. अनिल देसाई (शिवसेना – ठाकरे) यांना धारावीत ७६ हजार ६७७ मतं मिळाली होती. तर, राहुल शेवाळेंना (शिवसेना – शिंदे) केवळ ३९ हजार ८२० मतं मिळाली होती. ही आकडेवारी पाहता होऊ घातलेली विधानसभा निवडणूक मविआसाठी या मतदारसंघात सोपी ठरू शकते.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

दरम्यान, वर्षा गायकवाड लोकसभेवर गेल्या असल्या तरी त्यांची व काँग्रेसची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. मात्र, काँग्रेसकडून येथून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न अनेकंना पडला आहे. तर महायुतीत या जागेसाठी भाजपा व शिवसेनेचा शिंदे गट आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना भाजपाच्या आजवरच्या युतीत ही जागा सातत्याने शिवसेना लढवत आली आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसनेच्या बाबुराव मोरे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. या मतदारसंघावर शिवसेनेचीही चांगली पकड आहे. तसेच धारावीमधील पुनर्विकास प्रकल्पावरून या मतदारसंघात भाजपाविरोधी वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गट किंवा भाजपा, कोणत्याही पक्षाने येथून निवडणूक लढवली तरी उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आशिष मोरे यांनी वर्षा गायकवाड यांना जोरदार टक्कर दिली होती.

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (धारावी मतदारसंघ – Dharavi Assembly constituency)

वर्षा गायकवाड (काँग्रेस) – ५३,९५४ मतं
आशिष मोरे (शिवसेना) – ४२,१३० मतं
मनोज संसारे (एआयएमआयएम) – १३,०९९ मतं

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (धारावी मतदारसंघ – Dharavi Assembly constituency)

वर्षा गायकवाड (काँग्रेस) – ४७,७१८ मतं
बाबुराव माने (शिवसेना) – ३२,३९० मतं
दिव्या ढोले (भाजपा) – २०,७५३

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (धारावी मतदारसंघ – Dharavi Assembly constituency)

वर्षा गायकवाड (काँग्रेस) – ५२,४९२ मतं
मनोहर राबगे (शिवसेना) – ४२,७८२ मतं

ताजी अपडेट

धरावी मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तीन अर्ज बाद करण्यात आले आहेत, तर एक अर्ज मागे घेण्यात आला आहे. एकूण १६ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यानुसार शिवसेनेने (शिंदे) राजेश खंदारे यांना, तर काँग्रेसने ज्योती एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.