मुंबई : धारावी विधानसभा मतदारसंघ हा यावेळच्या निवडणुकीत चर्चेतला मतदारसंघ आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी चांगलाच गाजला व त्याचा महायुतीला चांगलाच फटकाही बसला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांना या मतदारसंघात तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड या निवडणूक लढवत आहेत. वर्षा गायकवाड या मतदारसंघाच्या आमदार होत्या. आता त्या खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला या मतदारसंघातून तिकीट दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे लोकसभेला मिळालेले मताधिक्य विधानसभेला गायकवाड कुटुंबाला राखता येईल का याबाबत उत्सुकता आहे. एवढे मताधिक्य मिळवणे अन्य कोणत्याही उमेदवाराला शक्य नसल्याचेही जाणकार सांगतात. मात्र धारावी बचाव आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी येथील गल्लीबोळातील घरोघरी जाऊन धारावी बचावचा मुद्दा पटवून दिला आहे. तसेच गायकवाड कुटुंबाने गेल्या ४० वर्षांत कोणताही विकास केला नसल्याचा मुद्दाही प्रचारात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा