लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: अदानी समूहाच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यास धारावीकर जोरदार विरोध करीत आहेत. राज्य सरकारपर्यंत हा विरोध पोहचविण्यासाठी बुधवारी, ऑगस्ट क्रांती दिनी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरणार आहेत. धारावी बचाव आंदोलनाच्या आणि धारावीतील राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी ५ वाजता येथील ९० फूट रस्त्यावरील कामराज हायस्कुलच्या मागे धारावीकर जमणार असून येथे अदानीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहेत. यावेळी ‘अदानी चले जाव’ची हाक देण्यात येणार आहे. तसेच मोर्चाचे रूपांतर नंतर जाहीर सभेत होणार आहे.

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या पुनर्विकासासाठी अदानीला अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. तर यातून अदानीला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा प्रकल्प अदानीला देण्यास धारावीकरांचा विरोध आहे. अदानीला पुनर्विकासाचा कोणताही अनुभव नसताना हा प्रकल्प देण्यात आल्याचा आरोप धारावीकरांकडून करण्यात येत आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील जमीन लाटली जाणार आहे, सर्वसामान्य धारावीकर धारावीतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, असा आरोप करीत धारावीकरांनी अदानी समुहाला विरोध केला आहे. आता अदानी समुहाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आणखी वाचा-चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच लोकलची धाव, सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा प्रवाशांना फटका

या आंदोलनाला बुधवारी, ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरुवात होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अदानीला धारावीत पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार धारावीकरांनी केला आहे. तसेच आंदोलनाची पुढील दिशा यावेळी निश्चित केली जाणार आहे.