वाढता ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैली यामुळे शहरांमध्ये मधमेहाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. बरेचवेळी आपल्याला मधुमेह आहे याचीही माहिती अनेकांना नसते. यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी दोन लाख लोकांची मधुमेहाची मोफत चाचणी करण्याचा आरोग्यदायी उपक्रम आखला आहे. संपूर्ण मुंबईत पाचशे ठिकाणी रक्ताची चाचणी करून जागच्या जागी मधुमेह आहे अथवा नाही, हे या उपक्रमात सांगितले जाणार आहे.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त ट्रायडंट हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महापौर सुनील प्रभू यांनी मधुमेह चाचणी उपक्रमाची घोषणा केली. पालिकेच्या या संभाव्य तपासणी मोहीमेत सुमारे दहा ते बारा हजार संभाव्य रुग्ण सोर येतील, असा अंदाज महापौर प्रभू यांनी व्यक्त केला. मधुमेहाविरु द्ध पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या लढय़ात पुढील वर्षी पाच लाख लोकांची चाचणी करण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले आहे. मधुमेहामुळे हृदयविकार, डोळ्यांचे तसेच मज्जासंस्थांचे विकार उद्भवतात. यासाठी येणारा खर्च लक्षात घेता जीवनशैलीत व खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून नियमित व्यायाम आणि उपचार केल्यास मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकतो. परिणामी आरोग्यवार होणारा अनावश्यक खर्चही वाचू शकतो, असे मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.
दोन लाख लोकांची आज मधुमेहाची चाचणी
वाढता ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैली यामुळे शहरांमध्ये मधमेहाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे.
First published on: 13-11-2013 at 04:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes test today of two lakh mumbai people