अनियमित कुरिअर सेवेमुळे वाचक नाराज; पुस्तके वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी
नमिता धुरी, लोकसत्ता
मुंबई : टाळेबंदीत पुस्तकांची दुकाने बंद असताना ई-बुक आणि पुस्तके घरपोच देणाऱ्या संके तस्थळांचा आधार वाचकांना वाटला होता. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरही गर्दीतून वाट काढत पुस्तक खरेदीसाठी जाण्यापेक्षा घरबसल्या पुस्तके मागवणे वाचकांसाठी सोयीचे आहे. मात्र अनियमित कु रिअर सेवेमुळे काही वाचकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
लातूरच्या हरिहर सारंग यांनी ५ मे रोजी बुकगंगा संकेतस्थळावरून पुस्तके मागवली होती. पुस्तके स्वीकारताना पैसे देण्याचा पर्याय नसल्याने पैसे ऑनलाइन भरले. बरेच दिवस पुस्तके घरपोच न मिळाल्याने त्यांनी संके तस्थळाशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. परंतु तो स्वयंचलित (ऑटोमॅटिक जनरेटेड) ईमेल असल्याने सारंग यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. नंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता कु रिअरशी संपर्क साधून पुस्तके मिळवून देण्याचे आश्वासन संकेतस्थळातर्फे देण्यात आले. त्यानंतर १२ जूनला कु रिअर सेवेच्या लातूर येथील कार्यालयात पुस्तक पोहोचल्याचा संदेश सारंग यांना मिळाला. मात्र पुस्तके घरपोच देण्यास त्यांनी नकार दिला. सारंग यांनी आपली मागणी मागे घेत असल्याचे कळवले. त्यानुसार २६ जूनला त्यांना पैसे परत मिळाले.
डोंबिवलीच्या स्वप्ना लिमये यांनी होमी भाभा परीक्षेसंदर्भातील पुस्तक एका प्रकाशनाच्या संके तस्थळावरून १५ जूनला मागवले. कु रिअर सेवेच्या कल्याणच्या कार्यालयात २५ जूनला पोहोचूनही पुस्तक अद्याप घरपोच मिळालेले नाही. पुण्याच्या अनुजा शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी बुकगंगावरून पुस्तक मागवले होते. त्या वेळी पुस्तक पाठवण्याची प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे याची कल्पना
संके तस्थळाकडून देण्यात येत नव्हती. योग्य पिनकोड देऊनही पुस्तक दुसऱ्याच पत्त्यावर पाठवण्यात आले. बुकगंगावर सध्या त्या ई-बुक वाचत आहेत. मात्र एखादे पुस्तक डाऊनलोड केल्यानंतर आधी डाऊनलोड केलेली पुस्तके नाहीशी होत असल्याचा अनुभव अनुजा सांगतात.
आमच्याकडून पुस्तक वेळेत पाठवले जाते. पण कुरिअर पोहोचवणाऱ्यांना काही ठिकाणी प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्याकडून पुस्तके पोहोचवण्यास उशीर होतो. ‘कॅ श ऑन डिलिव्हरी’चा पर्याय पूर्वी होता, मात्र काही ग्राहक पुस्तक घरी पोहोचल्यानंतर ते नाकारतात. त्यामुळे ‘बुक गंगा’ने तो पर्याय बंद करून फक्त ऑनलाइन पैसे भरण्याचा पर्याय ठेवला.
– लक्ष्मी अधाटे, बुकगंगा, कर्मचारी