अधिकृत लसीकरण प्रमाणपत्र न मिळाल्याने सेवांचा लाभ घेण्यात अडथळे

शैलजा तिवले/इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : लशींच्या चाचण्यांमध्ये लस घेतलेल्या स्वयंसेवकांना कोविनमधून दिले जाणारे लसप्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दोन्ही मात्रा घेऊनही रेल्वे प्रवासासह मॉलमध्ये प्रवेश इत्यादी सेवांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.

मुंबईत कोव्हिशिल्डच्या चाचण्या नायर आणि केईएम रुग्णालयात सप्टेंबर २०२० मध्ये, तर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डिसेंबर २०२० मध्ये सुरू झाल्या. या चाचण्या संपल्यानंतर ज्या व्यक्तींना चाचण्यांमध्ये लस दिली त्यांना रुग्णालयाच्या लेटरहेडवर लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. परंतु हे प्रमाणपत्र नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वे सेवा आणि अन्य ठिकाणी मान्य केले जात नसल्यामुळे दोन्ही मात्रा घेऊनही या सेवांचा वापर करता येत नाही.

Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
Bhushan Gagrani inaugurated the 'Home Away From Home' building
बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
Employment for youth in slums according to skills What is Activity by municipality
झोपडपट्टीतील युवकांना कौशल्यानुसार रोजगार; काय आहे उपक्रम…

मालाड येथील एका कंपनीत काम करणारे संतोष जगधने नायर रुग्णालयातील कोव्हिशिल्डच्या चाचण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. त्यांना ८ ऑक्टोबरला पहिली आणि १० नोव्हेंबरला दुसरी मात्रा दिली गेली. ‘चाचण्यांमध्ये लस मिळाल्याचे प्रमाणपत्र नायरने रुग्णालयाच्या लेटरहेडवर दिले आहे. कोविनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर क्यूआरकोड नमूद केलेला असतो. असा क्यूआरकोड आम्हाला दिलेल्या प्रमाणपत्रावर नाही. तसेच आरोग्य विभागाची राजमुद्राही नाही. त्यामुळे आमच्या प्रमाणपत्राला रेल्वेमध्ये मान्यता दिली जात नाही. मी कामासाठी दररोज नवी मुंबईहून मालाडला जातो. परंतु मला रेल्वे पासच मिळत नसल्यामुळे प्रवास करणे अडचणीचे होत आहे. तसेच आता मॉल प्रवेशासाठीही प्रमाणपत्राची अट घातली आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यावरही आरटीपीसीर न करण्यासाठी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. तेव्हा आम्हाला प्रमाणपत्र दिले जावे,’ असे संतोष यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मोठय़ा संस्थेत समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे अरुण सोनावणेदेखील नायरमधील लशींच्या चाचण्यांमध्ये सहभागी झाले होते. त्यांनाही कोव्हिशिल्डच्या दोन्ही मात्रा मिळालेल्या आहेत. ‘लशींच्या दोन्ही मात्रा घेऊनही आवश्यक प्रमाणपत्र नसल्यामुळे रेल्वेचा पास मिळालेला नाही. मी दोन ते तीन रेल्वे स्थानकांमध्ये रुग्णालयाने दिलेले प्रमाणपत्र दाखविले. परंतु यावर आम्हाला पास देता येणार नाही, असे रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगितले. मी कल्याणला राहतो आणि नोकरीसाठी ग्रॅन्टरोडला जातो. रेल्वे प्रवास खुला होऊनही मला प्रवास करता येत नाही,’ असे अरुण यांनी सांगितले.

लशींच्या चाचण्या सुरू झाल्या त्या वेळी कोविन अ‍ॅप विकसित झालेले नव्हते. कोविनवर या स्वयंसेवकांच्या लसीकरणाची माहितीच अद्ययावत झालेली नाही. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. स्वयंसेवकांपैकी ज्यांना ‘प्लासिबो’ दिला होता त्यांना त्याबाबत माहिती देऊन मग त्यांचेही लसीकरण करण्यात आले. मात्र प्रमाणपत्राचा विषय अद्याप सुटलेला नाही, असे ठाण्यातील स्वयंसेवकांनी सांगितले. याबाबत कोणाकडे दाद मागावी हे समजत नसल्यामुळे डॉक्टरांकडे याबाबत विचारणा केली. यावर लवकरच तोडगा निघेल असे आश्वासन दिल्याचे विलेपार्लेचे रहिवाशी वैभव बागुल यांनी सांगितले.

नायरमध्ये १३१ जणांच्या लशींच्या दोन्ही मात्रा झालेल्या असून काही स्वयंसेवकांनी प्रमाणपत्राबाबत मागणी केली आहे. त्यानुसार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (आयसीएमआर) यासंबंधी पत्रव्यवहार केला असून या स्वयंसेवकांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.

– डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

केईएममध्ये साधारण २० जणांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत. या व्यक्तींना ३१ ऑगस्टपर्यंत कोविनमधून प्रमाणपत्र दिले जाईल, असे आयसीएमआरने कळविले आहे.

– डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Story img Loader