मॉडेलवरील कथित बलात्कारप्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात संबंधित मॉडेलने मालवणी पोलीस ठाण्यात पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. त्याआधारे पारसकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारसकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयानेही त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना संबंधित मॉडेलच्या वर्तणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर पारसरकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात संबंधित मॉडेलच्या महानगरदंडाधिकाऱ्यांसमोरील जबाबासह ५८ साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा