मुंबईत विकासकाकडून झोपुवासीयांना भाड्यापोटी देण्यात येणारी रक्कम अॅक्सिस बँकेतच जमा करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस या बँकेच्या उपाध्यक्ष असल्यानेच अशाप्रकराच निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बँकेला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला. हा प्रकार म्हणजे वशिलेबाजीची हद्द झाली, अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी अमृता फडणवीसांवर हल्ला चढवला. दिग्विजय सिंह यांच्या ट्वीटवर मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पत्नी काय उत्तर देणार, किंवा त्यांच्याविरोधात कुठली कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अ‍ॅक्सिस बँकेतच खाते हवे! 

Story img Loader