अभिनय सम्राट दिलीप कुमार हे पत्नी सायरा बानो आणि काही निवडक परिचितांसह मक्केच्या यात्रेसाठी सौदी अरेबियात रवाना झाले आहेत. वयाची नव्वदी गाठली असली तरी ही धार्मिक यात्रा पूर्ण करण्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत.  दरवर्षी हजची यात्रा करावी, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मक्का येथील उमराह ही धार्मिक यात्राही आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे, अशी इस्लाम धर्माची परंपरा आहे. त्याला अनुसरून यंदा आपण ही यात्रा पूर्ण करण्यासाठी मक्केला जात असल्याचे दिलीप कुमार यांनी म्हटले आहे. ‘या वयातही उमराहची यात्रा पूर्ण करण्याची शक्ती अल्लाने मला दिली याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो’, असे दिलीप कुमार यांनी म्हटले आहे.

Story img Loader