सखेसोबत्यांच्या निधनामुळे दिलीपकुमार यांचा ९० वा वाढदिवस सुनासुना
पाली हिल येथील आपल्या बंगल्याच्या आवारात गेल्या वर्षी दणक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनी यंदाचा ९० वा वाढदिवस अजिबात साजरा केला नाही. या वर्षांत चित्रपटसृष्टीतील आणि इतर क्षेत्रांतील आपल्या अनेक मित्रांचे निधन झाले. आपले सखे सोबती आपल्याला सोडून पुढे गेल्याचे आपल्याला दुख आहे. त्यामुळेच यंदाचा वाढदिवस अजिबात साजरा करणार नसल्याचे दिलीप कुमार यांनी आपल्या ब्लॉगवरून स्पष्ट केले. मात्र चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर दिलीप कुमार यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला केक कापताना आपले परममित्र यश चोप्रा आपल्या बाजूलाच उभे होते. तेव्हा आवर्जून उपस्थित राहिलेले राजेश खन्ना यांचेही निधन झाले. त्याशिवाय दरवर्षी आपल्या वाढदिवसाला दूरध्वनीवरून आपल्याला शुभेच्छा देणाऱ्या दारासिंग यांचाही दूरध्वनी येणे आता शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे आता नाहीत, अशी हळवी भावना दिलीप कुमार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या ब्लॉगवर व्यक्त केली. एवढे मित्र एकाच वर्षांत काळाने हिरावून घेतल्यानंतर वाढदिवस कसा साजरा करणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
या नायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची ‘रांग’ लागली. यात अमिताभ बच्चन, शबाना आझमी, जावेद अख्तर, अनुपम खेर, मनोज वाजपेयी अशा कलाकारांचा समावेश आहे. आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा