हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांना येत्या दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 
अस्वस्थ वाटू लागल्याने दिलीपकुमार यांना १५ सप्टेंबर रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना अतिदक्षता विभागातून स्वतंत्र खोलीमध्ये हलविण्यात आले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी दिलीपकुमार यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
दिलीपकुमार यांची तब्येत सुधारत आहे. औषधोपचारांना त्यांचे शरीर उत्तर प्रतिसाद देत असून, दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अभिनेत्री शबाना आझमी, फरिदा जलाल, आशा पारेख अभिनेते रझा मुराद आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनीही दिलीपकुमार यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.

Story img Loader