ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या ९४ व्या वर्षी अठरा वर्षे जुन्या कोर्ट केस प्रकरणी मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे. तब्येत नाजूक असतानाही ते न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती त्यांची पत्नी सायरा बानू यांनी ट्विटरवर दिली.
त्या लिहितात, ‘दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना सांगताना दु:ख होत आहे पण मंगळवारी दिलीपजी एका अठरा वर्षे जुन्या कोर्ट प्रकरणाच्या सुनावणीसाठी गिरगावच्या कोर्टात हजर राहणार आहेत.’ यासोबतच आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी न केल्याबद्दलही बानू यांनी दिलीप कुमार यांचे कौतुक केले. तसेच दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन बानू यांनी केले आहे.
1) From Saira Banu: Breaks my heart to inform @TheDilipKumar fans. tomm, Tuesday, 18-yr-old court case in which Saab has been associated,
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 22, 2016
2) will be up for judgement hearing at 14 Met. Magistrate court, Girgaum, presided by Hon. Magistrate BS Kharade…
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 22, 2016
3).. At 94 yrs, Saab’s health is delicate, facing neurological problems, yet Saab has never prayed for case adjournment
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 22, 2016
4. Hope serious consternation n stress caused don’t affect his condition further. Saab needs peace n rest. I seek your prayers n support
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 22, 2016