संगीत, अभिनय, नाटय़, समाजसेवा, साहित्य, सिनेमा यांसारख्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २४ एप्रिल रोजी दिले जातात.
अभिनेत्री जया बच्चन, गायक सुरेश वाडकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी, समाजसेवक गणपतराव पाटील,
नीला श्रॉफ, सुनील बर्वे आदी यंदाच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. एक लाख एक हजार एक रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.
दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी २४ एप्रिल रोजी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या पुरस्कार
सोहळ्यात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यानंतर सोनू निगम संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
अभिनयाद्वारे नाटय़ व सिनेमा क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्याने योगदान दिल्याबद्दल मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना गौरविण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील दीर्घकाळ योगदानाबद्दल सुरेश वाडकर यांची निवड करण्यात आली आहे.
जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून आपल्या सुबक संस्थेतर्फे
ती रंगभूमीवर आणण्याचे अतुलनीय कार्य केल्याबद्दल अभिनेता व सुबक संस्थेचा प्रमुख सुनील बर्वे यांना यंदाचा मोहन वाघ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक सेवेबद्दल वात्सल्य संस्थेच्या प्रमुख नीला श्रॉफ यांना आनंदमयी पुरस्कार देण्यात येणार असून सामजिक सेवेबद्दल गणपतराव पाटील यांनाही गौरविण्यात येणार आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी यांना ‘वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान केला जाणार असून मराठी नाटय़ व सिनेक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अभिनेत्री वंदना गुप्ते यांना मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा
संगीत, अभिनय, नाटय़, समाजसेवा, साहित्य, सिनेमा यांसारख्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २४ एप्रिल रोजी दिले जातात.
First published on: 10-04-2013 at 06:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinanath mangeshkar award declared