महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंची ही सभाही गाजली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्या, असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर यावर आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपाली सय्यद यांना विचारलं की राज ठाकरे यांनी अजान जर सुरु असेल तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा असे वक्तव्य केले होते. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? यावर दीपाली म्हणाली, “राजजींचं हे वक्तव्यं मला पटलेलं नाही. हे बोलून तुम्ही दंगली करत आहात वाद करत आहात. प्रत्येकाचा धर्म त्याच्यासाठी मोठा किंवा महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोना तर न्यायालय आहे, तिथे जा या आधी तिहेरी तलाकवर निर्णय मिळाला आताही मिळेल. मला असं वाटतं की त्यांनी जर ही गोष्ट त्या पद्धतीने केलं असतं ना तर ते उत्तम झालं असतं.”

आणखी वाचा : “माझा धर्म परिवर्तन करून, मंदिरासमोर…”; ईराणी अभिनेत्री मंदाना करीमीने सांगितले लग्नानंतरचे धक्कादायक वास्तव

तर, गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipali sayyad reaction on mns raj thackeray masjid hanuman chalisa dcp