मुंबई : ठाणे, नवी मुंबई, वसई – विरार परिसरातील खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घर परवडणाऱ्या दरात सोडतीशिवाय घेण्याची संधी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २० टक्के आणि १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत कोकण मंडळाला उपलब्ध झालेली ९१३ घरे विक्रीवाचून रिक्त आहेत. नियमानुसार ही घरे काही ठरावीक कालावधीत विकणे कोकण मंडळाला बंधनकारक आहे.

खासगी विकासकांच्या प्रकल्पात अत्यल्प, अल्प गटाला चांगल्या दर्जाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत, त्यांचे जीवनमान उंचावे याकरिता राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजना आणली. या योजनेअंतर्गत कोकण मंडळाला मागील दोन-तीन वर्षांत मोठ्या संख्येने सोडतीसाठी घरे उपलब्ध झाली आहेत. खालापूर, टिटवाळा, कावेसर आदी ठिकाणची

Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
MVA seat-sharing agreement for Maharashtra polls
Maharashtra Election 2024: याद्यांच्या प्रतीक्षा कायम! ‘मविआ’त मतभेद उघड; महायुतीतही जागावाटपावर मौन
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
easy kandil making at home for diwali how to make akashkandil at home easy steps video diwali lantern
Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे

तरीही घर घेता येणार

सोडतीच्या धोरणानुसार अर्जदाराचे राज्यात कुठेही सरकारी अर्थात सिडको, म्हाडा, एसआरए योजनेसह अन्य योजनेतील घर नसावे. त्या त्या पालिका क्षेत्रात हक्काचे घर नसावे. उत्पन्नानुसारच घरांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. एकूणच म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अनेक नियम-अटी शर्ती आहेत. पण प्रथम प्राधान्यमधील घरांसाठी या कोणत्याही अटी लागू होत नाही. एखाद्याची कुठेही कितीही घरे असली तरी त्याला घर घेता येणार आहे. शिवाय केवळ पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच कागदपत्रे आवश्यक असून सोडतीचा प्रश्नही येथे येत नाही.

हेही वाचा >>>Coldplay Ticket : “तिकिटांचा काळा बाजार…”, कोल्ड प्ले तिकिट विक्रीवरून बुक माय शोवर टीका झाल्यानंतर कंपनीने दिलं स्पष्टीकरण!

म्हाडा किमतीत घरे

म्हाडा सोडतीत एकापेक्षा अधिक घरांसाठी एखादा अर्जदार विजयी ठरला तरी त्याला कोणतेही एकच घर स्वीकारता येते. तर उर्वरित घरे परत (सरेंडर) करावी लागतात. महत्त्वाचे म्हणजे एखादा लाभ घेतल्यानंतर संबंधित अर्जदार पती-पत्नीला त्यानंतर म्हाडाच्या वा इतर सरकारी योजनेत सहभागी होता येत नाही. पण प्रथम प्राधान्यच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक घरे घेण्याचीही मुभा असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही घरे खासगी विकासकाच्या प्रकल्पातील असल्याने आणि म्हाडाच्या किमतीत ती उपलब्ध होणार असल्याने इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

मूळ उद्देशाला हरताळ?

अत्यल्प आणि अल्प गटाला परवडणाऱ्या दरात खासगी विकासकाच्या प्रकल्पात घर मिळावे या उद्देशाने २० टक्के आणि १५ टक्के योजना आणली आहे. तर गरजू, ज्यांचे कुठेही घर नाही अशांना घरे देण्यासाठी ही योजना आणली आहे. असे असताना आता मात्र या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. कारण सर्वसामान्यांसाठीची ही घरे आता कोणीही घेऊ शकणार आहे. पण सहा महिन्यांच्या आत ही घरे विकणे बंधनकारक असल्याने याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हाडाकडून सांगितले जात आहे.

तातडीने वितरण

●नियमानुसार या योजनेतील घरे मंडळाकडे आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांची विक्री करणे मंडळाला बंधनकारक आहे. अन्यथा विकासक ही घरे परत घेऊन बाजारभावानुसार विकून नफा कमावू शकतात.

●ही अडचण लक्षात घेता २० टक्के आणि १५ टक्क्यांतील रिक्त घरांची विक्री आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या घरांच्या किमती मागील सोडतीत होत्या त्याच ठेवण्यात आल्या आहेत.