राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून बुधवार, २० मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून पाहायला मिळणार आहे. दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रक्षेपण पाहायला मिळेल. तसेच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रा. एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक कार्यक्रमात चर्चेसाठी येणार आहेत. चर्चेचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे करणार असून कार्यक्रमाची निर्मिती जयू भाटकर यांनी केली आहे.
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सह्यद्री वाहिनीवर
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून बुधवार, २० मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून पाहायला मिळणार आहे.
First published on: 20-03-2013 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direct telecasting of finance budget session on sahyadri channel