मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी २४ ऑक्टोबरपासून मुक्त फेरी राबविण्यात येत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुक्त फेरीच्या दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये फक्त सरकरी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांतील प्रवेश होणार आहेत. तर खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांना या फेरीतून वगळण्यात आले आहे. खासगी महाविद्यालयातील प्रवेश हे संस्थात्मक फेरीतून करण्यात येणार असून, ही फेरी १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैद्यकीय व दंत अभ्याक्रमाच्या तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागांसाठी २४ ऑक्टोबरपासून ऑनलाईन मुक्त फेरी राबविण्यात येत आहे. मात्र प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सरकारी महाविद्यालयांमधील प्रवेश ऑनलाईन मुक्त फेरीद्वारे करण्यात यावे, तर पुढील दोन मुक्त फेऱ्यांमधून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना वगळण्यात यावे. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश हे संस्थात्मक फेरीद्वारे करण्यात यावेत असे निर्देश दिले. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमधील संस्थात्मक फेरीचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी राज्य कोटा आणि संस्थात्मक कोट्यासाठी स्वतंत्रपणे विहित नमुन्यात संबंधित महाविद्यालयात ई-मेलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. ई-मेलद्वारे १ ते २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अर्जदारांची यादी, गुणवत्ता यादी, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी (कोटानिहाय) स्वतंत्रपणे महाविद्यालयातील फलकावर आणि संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व शुल्कासह विद्यार्थ्यांना ३, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाविद्यालयाच्या फलकावर आणि संकेतस्थळावर रिक्त जागा आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागेसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच ३.३० वाजेपर्यंत गुणवत्ता यादीनुसार या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार असून, रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत रिक्त जागांवर तपशील घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयांकडून अपलोड करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direction of bombay high court admission in the second and third round of the open round only in government medical and dental colleges mumbai print news amy