पीके, थ्री इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई या सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या दुचाकीचा मंगळवारी रात्री उशीरा अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री उशीरा पालीहिल भागातून जात असताना त्यांच्या बुलेट गाडीचा अपघात झाला. यामध्ये राजकुमार हिरानी यांच्या जबड्याला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजकुमार हिरानी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर मंगळवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader