वडाळ्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना सध्या साचलेल्या पाण्याचा आणि वाढलेल्या रानझाडांचा त्रास सहन करावा लागत आहे. वसाहतीतील अनेक इमारतींसमोर पावसाचे पाणी साचून राहिल्याने डेंग्यूसदृश डासांच्या अळ्याची पदास होण्याची भीती रहिवाशांना वाटते आहे.

डेंग्यूची लागण होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पदास ही साचलेल्या आणि प्रवाहित नसलेल्या पाण्यातच होते. वडाळा पूर्वेला असणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत सध्या पावसाचे पाणी इमारतींसमोर साठून राहिले आहे. त्यात डेंग्यूच्या डासांची पदास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यामधून वाहून जात नाही. ते तिथेच तीन-चार दिवस साचून राहते. वसाहतीतील २९ क्रमांक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना या साचलेल्या पाण्याचा त्रास सर्वाधिक जाणवतो आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

पावसाच्या दिवसातही इमारतीसमोर ६-७ इंच पाणी सहा-सात दिवस साचून राहते. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. केवळ साचलेल्या पाण्याचे छायाचित्र काढून घेतले जाते, अशी माहिती तेथील एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या शिवाय या परिसरात मोठय़ा प्रमाणावर रानगवत माजले आहे.

बंद खोल्यांमध्ये गळती

या वसाहतीतील कित्येक इमारतींची अवस्था राहण्याजोगीही नाही. दुरुस्ती न केल्यामुळे काही बंद खोल्यांच्या छतामधून पाण्याची गळती होत राहते. ते पाणी या खोल्यांमध्ये साचून राहते. यावर प्रशासन काही उपाययोजना करत नसल्याने रहिवासीच अशा कुलूपबंद खोल्यांच्या छताला प्लास्टिकच्या ताडपत्री लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader