सामान्यपणे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची प्रथा असताना सत्ताधारी भाजप-सेनेने ही चर्चा मुदतीपूर्वी शुक्रवारी घेण्याचे जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला. तेव्हा यापूर्वीही अर्थसंकल्पावर मुदतीपूर्वी चर्चा झाल्याचे महसूलमंत्री खडसे यांनी निदर्शनास आणताच एखाद्याने गाय मारली तर तुम्ही वासरू मारणार का, असा सवाल करत गोहत्या बंदी लागू करणाऱ्यांनी तरी योग्य काळजी घ्यावी अशी कोपरखळी विरोधकांनी मारताच सोमवारपासून दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा घेण्याचे खडसे यांनी जाहीर केले.
राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातून नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसकडून उद्या केली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शुक्रवारी भेट घेतली. अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या राणे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राणे यांनी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.
अर्थसंकल्पावर सोमवारपासून चर्चा
सामान्यपणे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची प्रथा असताना सत्ताधारी भाजप-सेनेने ही चर्चा मुदतीपूर्वी शुक्रवारी घेण्याचे जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला.
First published on: 21-03-2015 at 04:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion on budget from monday