आईच्या महतीला सलाम करणारा मातृदिन सर्वत्र साजरा होत असतानाच ठाण्यात मातृत्वाच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या दोन घटना उजेडात आल्या. शहराच्या दोन भागांत दोन स्त्री अर्भकांना त्यांच्या जन्मदात्यांनीच फेकून दिल्याचे रविवारी आढळून आले. त्यापैकी एका अर्भकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरे अर्भक कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
ठाण्यातील कोरम मॉल शेजारील नाल्यात गोणपटात गुंडाळलेले स्त्री जातीचे एक मृतावस्थेतील अर्भक सापडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे अर्भक वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरे अर्भक मुंबई पनवेल महामार्गावरील दहीसर मोरी येथील मंगलमूर्ती पेट्रोलपंपासमोरील मोकळ्या जागेत एका कपडय़ात गुंडाळलेले आढळले. हे अर्भक जीवंत असल्याने या मुलीला कळवा येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही घटनांचा पोलीस तपास सुरू आहे.
ठाण्यात दोन स्त्री अर्भके सापडली
आईच्या महतीला सलाम करणारा मातृदिन सर्वत्र साजरा होत असतानाच ठाण्यात मातृत्वाच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या दोन घटना उजेडात आल्या. शहराच्या दोन भागांत दोन स्त्री अर्भकांना त्यांच्या जन्मदात्यांनीच फेकून दिल्याचे रविवारी आढळून आले.
First published on: 12-05-2014 at 01:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disinherit girl child spotted in thane