मुंबई : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी महायुतीच्या नेत्यांना केल्या. शहा यांनी रात्री भाजपच्या विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या ज्या चुकांमुळे अपयश आले, त्या टाळण्याच्या सूचना शहा यांनी केल्या, असे सूत्रांनी सांगितले.
शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी. काही निकषांच्या आधारे जागावाटप करावे, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत, आदी सूचना शहा यांनी केल्या. शहा हे शिंदे व फडणवीस यांच्या निवासस्थानी सोमवारी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. त्यावेळीही शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – यंदा मुंबईतील गणेशोत्सवात मंदिरांचे दर्शन
विधान परिषदेवर बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न महायुतीतील वादामुळे अडकला आहे. भाजपला सहा आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन हा भाजपचा प्रस्ताव अजित पवार यांना मान्य नाही. यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.
शहा यांनी या बैठकीत राज्यातील महत्वाचे विषय, मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी मोफत वीज आदी योजनांचा निवडणुकीत राजकीय लाभ कसा मिळविता येईल, भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर विजय कसा मिळविता येईल, आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. मराठवाड्यासह काही भागात मराठा आरक्षणाचा भाजपला मोठा फटका बसला. संविधान बदलाची चर्चा, कांदा निर्यातबंदीसह काही बाबींमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.