लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर भविष्यात दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिकेच्या बांधणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणि सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या कामासाठी लवकरच एमएमआरडीए आणि सिडकोकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

एमएआरडीएच्या सर्वंकष वाहतूक अहवालानुसार एमएमआरडीएने आपल्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पात मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिका मेट्रो ८ नावाने प्रस्तावित केली आहे. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान वाढणारी वाहतुक लक्षात घेता मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. पण सिडको आणि एमएमआरडीएने ही मार्गिका उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

आणखी वाचा- मुंबई: बुलेट ट्रेनच्या कामासाठी विक्रोळीतील १,८२८ झाडांवर कुऱ्हाड

अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या मुंबईतील टप्प्याची बांधणी एमएमआरडीए तर नवी मुंबई परिसरातील टप्प्याची उभारणी सिडको करणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रो ८ मधील मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशा १०.१ किमीच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला. मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ टप्प्याच्या आराखड्यासाठी सिडकोने अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची नियुक्ती केल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा आराखडा येत्या पाच महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तत्काळ या मार्गिकेच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती सिडकोकडून केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस एमएमआरडीएकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. एकूणच आता मेट्रो ८ मार्गिका लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने मेट्रो ८ मार्गिका मार्गी लावण्यासाठी सिडकोने हालचालींना वेग दिला आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर कमी होणार आहे.

आर्थिक विकासाला चालना

नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यास नवी मुंबईसह आणि मुंबईतील वाहतुकीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशी मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे मुबंई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर कमी होणार आहेच. पण त्याचवेळी नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो ८ मार्गिकेमुळे मार्गिकेच्या आसपासच्या परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल. -संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका प्रस्तावित आहे. याबाबत सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. -एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त

अशी असेल मेट्रो ८ मार्गिका

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका अंदाजे ३२ किमी

अंधेरी ते घाटकोपरदरम्यान भूमिगत मेट्रो मार्गिका; नंतर घाटकोपर ते मानखुर्ददरम्यान आणि त्यापुढेही ही मार्गिका उन्नत असेल

मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ अशी मार्गिका पामबीचला समांतर असेल.

नवी मुंबई विमानतळ टर्मिनल इमारत ते मुंबई विमानतळ इमारत असा हा थेट मार्ग असेल

या मार्गिकेमुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटात पार करता येणार

वाशी खाडीवरून मेट्रो जाणार; त्यासाठी खाडीवर दोन किमीचा पूल असेल

या मार्गिकेत सात मेट्रो स्थानकांचा समावेश असेल

२० मिनिटांच्या वारंवारतेने तर ८०-९० प्रति किमी वेगाने मेट्रो धावण्याची शक्यता