भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा राजीनाम्याचा निर्णय सर्वासाठीच क्लेशदायक असून त्यांचे मन वळवावे लागेल, असे परदेश दौऱ्यावर असलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपच्या पक्षबांधणीतील आडवाणी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याशिवाय भाजप व एनडीएचा विचार करताच येत नाही, असेही उद्धव यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाची व अनुभवाची नव्या पिढीला गरज असल्याने राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवावे लागेल, असेही ते म्हणाले. लालकृष्ण आडवाणी यांनी सोमवारी भाजपच्या संसदीय मंडळ, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि निवडणूक समिती या पदांचा राजीनामा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका उद्धव यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा