टीकेनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षाला राज्य सरकारच्या निर्णयानुसार फक्त एक वाहन वापरण्याची परवानगी असताना परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते हे महामंडळाची चार ते पाच वाहने ‘उपयोगात’ आणत असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात उघडकीस आणली. यानंतर यापुढे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सरकारने मंजूर केलेली एकच गाडी वापरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता ‘एमएच-०६-एए-९९०’ ही २० लाखांची इनोव्हा गाडीच रावते यांच्या ताफ्यात असणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून महामंडळाच्या तिजोरीत २० लाखांपर्यंतची गाडी खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार रावते यांना सहा महिन्यांपूर्वी टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली. त्यानुसार पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयातून या गाडीची नोंदणी करण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही गाडी मंजूर झाली असताना रावते यांनी ही गाडी ताफ्यात दाखल करून घेतली नव्हती.

आता मात्र ‘लोकसत्ता’ने ‘परिवाहन मंत्री’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत रावते यांनी यापुढे केवळ सरकारने मंजूरी दिलेली गाडीच वापरणार असल्याची कबूली त्यांनी दिली आहे. तसेच सरकारकडून एसटी महामंडळाकडून गाडी मागितल्यास ती गाडी परिवहन मंत्र्यांच्या नावावर न जाता, ती गाडी मागविणाऱ्याच्या किंवा खात्यांच्या नावावर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘बस घेऊनच फिरावे’

रावते यांनी एस. टी. मंडळाच्या चार-चार गाडय़ांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा सरळ सरळ एस.टी.ची बस घेऊनच फिरावे, असा उपरोधिक सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिला. रावते यांच्या संदर्भात ‘परिवाहनमंत्री’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे विधानसभेत पडसाद उमटले.